राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. राज्यात चोवीस तासांत साधारण तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. येत्या 25 ते 28 जुलै दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात आतापर्यंत 85.78 इंच पावसाची नोंद झाली आहे.
फोंडा येथे सर्वाधिक 4.48 इंच पावसाची नोंद झाली. वाळपई येथे 3.98 इंच, केपे येथे 3.96 इंच, सांगे येथे 3.62 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील इतर भागांतही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निधी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राज्यातील आपत्ती व्यवस्थापनावर खर्च करण्यासाठी बाराही तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडून हा निधी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे.