मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्हिडीओतील मुख्य आरोपीचे घर शुक्रवारी अज्ञातांनी जाळले.