जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
5

बुधवारी सकाळी सुरक्षा दलाच्याजवानांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. चकमकीनंतर बीएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली. दहशतवाद्यांकडून 4 एके रायफल आणि 6 हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी भारतीय सैन्याने चार सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापैकी तीघे पाकिस्तानचे रहिवासी होते, तर एक पीओकेचा रहिवासी होता. 16 आणि 17 जुलैच्या मध्यरात्रीदेखील सुरक्षा दलाने पूंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन त्रिनेत्र-2 दरम्यान चार परदेशी दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.