राज्यात पावसाच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली असून, येत्या 21 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल दिवसभरात पावसाची संततधार सुरुच होती. दिवसभरात राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
मागील चोवीस तासांत राज्यात 1.67 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 66.67 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे आत्तापर्यत सर्वाधिक 76.87 इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने येत्या 21 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. चोवीस तासांत साखळी येथे सर्वाधिक 2.74 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 2.63 इंच, पेडणे येथे 1.90 इंच, पणजी येथे 1 इंच, वाळपई येथे 2.33 इंच, काणकोण येथे 0.79 इंच, दाबोळी येथे 0.81 इंच, मडगाव येथे 2.01 इंच, मुरगाव येथे 0.53 इंच, केपे येथे 1.11 इंच, सांगे येथे 2.65 इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 11 घटनांची नोंद झाली.