>> पं. अजित कडकडे यांचे गायन आकर्षण
>> सम्राट क्लब हळदोणातर्फे स्पर्धेचे आयोजन
येथील श्री बोडगेश्वर संस्थानच्या सभागृहात पर्यटन खाते व कला व सांस्कृतिक संचालनालय, पणजी यांच्या सहकार्याने सम्राट क्लब हळदोणा आयोजित सम्राट संगीत सितारा स्पर्धेची अंतिम फेरी 22 जुलै रोजी संध्याकाळी 5 वा. आयोजित करण्यात आली आहे. प्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांचे गायन या स्पर्धेचे आकर्षण असेल.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक पं. अजित कडकडे, उद्घाटक म्हणून उस्ताद शुजात हुसेन खान, समारोपाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, खास अतिथी सम्राट इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रफुल हेदे, राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, सम्राट संगीत सितारा स्पर्धेचे अध्यक्ष प्रसाद नाईक, गोकुळदास कुडाळकर, राज्य खजिनदार सुरज नाईक, हळदोणा सम्राट क्लबचे अध्यक्ष मंगल हळदोणकर, कार्यक्रम समन्वयक सर्वेश रायकर, सचिव सिद्धी रायकर उपस्थित राहतील, अशी माहिती हळदोणा सम्राट क्लबने म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर, प्रकल्प अधिकारी प्रसाद नाईक, हळदोणा सम्राट क्लब अध्यक्ष मंगल हळदोणकर, कार्यक्रम संयोजक सर्वेश रायकर, राज्य खजिनदार सुरज नाईक, सदस्य रवींद्र पणजीकर, म्हापसा सम्राट क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर उपस्थित होते. सम्राट संगीत सितारा या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना राज्य अध्यक्ष शैलेश बोरकर यांनी सांगितले की, उद्घाटन समारंभ वरील मान्यवरांच्या हस्ते होईल. त्यानंतर अनिष्का नाईक, श्रुती सालेलकर, अर्चना कामुलकर, अवी परवार, दत्तराज च्यारी या कलाकारांचे गायन होईल.
त्यानंतर पं. अजित कडकडे यांच्या गायनाची मैफल होणार आहे. बक्षीस वितरण समारंभ गोविंद गावडे व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संगीत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सम्राट क्लबच्या अध्यक्ष मंगला हळदोणकर यांनी केले.