बेपत्ता वनाधिकाऱ्याच्या अपहरणाचा संशय व्यक्त

0
4

राज्याच्या वन खात्यात वनाधिकारी म्हणून काम करणारे धाराजीत नाईक हे मागील आठवड्यापासून बेपत्ता आहेत. दरम्यान, त्यांची कार मिरामार पणजी येथे आढळून आली आहे. धाराजीत नाईक हे उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 11 जुलै रोजी घरातून बाहेर पडले; मात्र त्यानंतर त्याचा पत्ता लागलेला नाही. धाराजीत नाईक यांचे अपहरण करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, त्याबाबतची तक्रार फोंडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.