युमनेला पूर; दिल्ली जलमय

0
7

सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे राजधानी दिल्ली आता पुराच्या कचाट्यात सापडली आहे. यमुना नदीची पाणीपातळी आता 208.46 मीटरपर्यंत वाढली आहे. संततधार आणि हरयाणातील हथिनी कुंड बैराजमधून पाणी सोडले जात असल्याने यमुना नदीची पाणीपातळी वाढत चालली आहे. परिणामी पूरग्रस्त भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. तीन जलप्रक्रिया प्रकल्पही बंद ठेवावे लागले असून, चोहोबाजूला पाणी असूनही आता पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत. यमुनेला आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या भागांतील अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून, तेथील 16 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.