मणिपूरमध्ये अद्यापही हिंसाचार सुरूच

0
4

मणिपूरमध्ये हिंसाचार अद्याप सुरूच असून, पूर्व इम्फाळ जिल्ह्यात दोन समुदायांत वारंवार झालेल्या चकमकीत गोळीबार करण्यात आला. सुमारे दीडशे ते दोनशे जणांच्या संतप्त जमावाने पश्चिम इम्फाळमध्ये दोन वाहने जाळली आणि येथील ऐतिहासिक कंगला किल्ल्याजवळ पोलिसांकडून शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले. संतप्त जमावाने पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात दोन वाहने जाळली. कंगला किल्ल्याजवळील महाबली रोडवर दीडशे-दोनशे जणांच्या जमावाने दोन वाहने पेटवून दिली. गर्दीतील लोकांना संशय आला होता की ही वाहने एका विशिष्ट जातीय समुदायाला घरगुती वस्तू पोहोचवण्यासाठी वापरली जात आहेत. यावेळी जमावाने पोलिसांकडून शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना जमावावर गोळीबार करावा लागला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. त्यानंतर हिंसाचारासाठी रस्त्यावर उतरलेल्या जमावाला पांगवण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले. गुरुवारी मध्यरात्री कांगवा येथे दोन गटांतील हिंसाचारात मणिपूर पोलीसदलातील एका कमांडोसह चौघांचा मृत्यू झाला होता. तर कांगवा, सोंग्दो आणि अवांग लेखई येथे हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला.