लेकीचा बापच नराधम बनल्याची घटना सासष्टी तालुक्यात घडली. 47 वर्षीय बापाने आपल्या स्वत:च्या 22 वर्षाच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला काल अटक केली. पीडित मुलीची आई कामानिमित्त परदेशात राहते. त्यामुळे मुलीची जबाबदारी बापावर होती. मात्र त्यानेच सांभाळ करण्याच्या निमित्ताने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. सदर मुलीचा बाप बसचालक असून, त्याने जून महिन्यात मारहाण करीत तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच हा प्रकार उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित मुलीने पोलीस स्थानकात नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून बापाला अटक केली व गुन्हा नोंद केला आहे.