मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात शुक्रवार दि. 7 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सावंत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दूरदर्शन पणजी केंद्रावरून लाइव्ह फोन-इन कार्यक्रमात लोकांशी थेट संवाद साधतात. गेल्या महिन्यापासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यासाठी 2222424 आणि 2225204 या दूरध्वनी क्रमांकावर संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत संपर्क साधता येईल, असे कळविण्यात आले आहे. हा कार्यक्रम एकाच वेळी डीडी, फ्री डिश, डीटीएच वर उपलब्ध असेल.