पणजी महापालिकेने मिरामार व आसपासच्या परिसरात येणारा पूर व पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठीच्या प्रकल्प हाती घेण्याची योजना आखली असून, त्यात शहरी नियोजनाचाही समावेश केला आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पणजी महापालिकेने सल्लागारांकडून अथवा सल्लागार कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. हायड्रोलॉजी, हायड्रोलिक्स, पुरावर उपाययोजना करणे आदीमध्ये ज्यांना अनुभव आहे अशा सल्लागार व सल्लागार कंपन्यांना निविदा प्रक्रियेत भाग घेता येईल, असे कळवण्यात आले आहे. त्यांना डीपीआरबरोबरच डिझाईन, अंदाजखर्च व प्रकल्पाचे सुपरविजन आदींचीही जबाबदारी घ्यावी लागेल.