येथील हवामान विभागाने राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून, ऑरेंज अलर्ट जारी करत मंगळवार दि. 4 ते गुरुवार दि. 6 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच 7 जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत 4.22 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे सर्वाधिक 6.69 इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, राज्यात मागील दहा-बारा दिवस पडणाऱ्या चांगल्या पावसामुळे राज्यातील पावसाच्या तुटीचे प्रमाण आता 12.3 टक्क्यांवर आले आहे.