माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. मनोहर उसगावकर यांचे निधन

0
9

गोव्यातील सुप्रसिद्ध वकील, भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तथा गोव्याचे माजी ॲडव्होकेट जनरल मनोहर सिनाय उसगावकर (89) यांचे काल करंझाळे येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काल दुपारी 12 वाजता सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी देखील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात तीन पुत्र सुदिन, सुहर्ष व ॲड. सुदेश उसगावकर, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
ॲड. मनोहर उसगावकर यांचा पोर्तुगीज कायदे व भारतीय कायदे यांचा गाढा अभ्यास होता. एक अत्यंत यशस्वी वकील अशी त्यांची जनमानसात ओळख होती.