पेडण्यातील थीम पार्क गार्डनची प्रक्रिया सुरू

0
16

राज्य सरकारने पेडणे येथे थीम पार्क गार्डन प्रकल्पासाठी सदर क्षेत्र गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाकडे मे. ब्रम्हा कॉर्प कंपनीने पेडणे येथे थीम पार्क गार्डन स्थापन करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. मंडळाने या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली असून, राज्य सरकारला सदर जागा गुंतवणूक प्रोत्साहन क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारने गोवा गुंतवणूक मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घर कर, इतर कर, शुल्क वसुली व इतर सर्व प्रकारचे देयक यांचे मूल्यमापन व वसुलीसाठी नियुक्ती केली आहे.