मणिपूरमध्ये 52 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. राज्यात शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी या वेळी विरोधकांनी केली.
दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री शहा यांनी, 13 जूननंतर राज्यातील हिंसाचारात एकही मृत्यू झालेला नाही, असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन करत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्याचबरोबर शांतता नांदावी यासाठी सर्व पक्षांच्या प्रस्तावावर केंद्र सरकार खुल्या मनाने विचार करेल, असे आश्वासनही शहा यांनी दिले. यावेळी शहा यांनी, हिंसाचारादरम्यान लुटलेली 1800 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत.
या बैठकीत भाजप, काँग्रेससह 18 पक्ष, पूर्वोत्तरचे चार खासदार, दोन मुख्यमंत्री सहभागी झाले होते.