दोन्ही जिल्ह्यांत 3 जुलैला आयोजन
राज्य सरकारने राज्यातील जनतेची विविध गाऱ्हाणी व प्रश्न ऐकून ते सोडवण्यासाठी आता जनता दरबारचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा जनता दरबार महिन्याला एकदा होणार असून, तो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार आहे.
हा जनता दरबार उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांत आयोजित करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. दर महिन्याला होणाऱ्या जनता दरबाराला उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात एक कॅबिनेट मंत्री हजर राहून जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करणार आहे. पहिला जनता दरबार पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे 3 जुलैला होणार आहे. दक्षिण गोव्यातील जनता दरबारला सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, तर उत्तर गोव्यातील जनता दरबारला महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हेही हजर राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.