कळंगुट पंचायतीने शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेला कळंगुट पोलीस ठाण्याजवळील प्रमुख जिल्हा मार्गालगत नव्याने बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा 10 दिवसांच्या आत हटविण्याची नोटीस जारी केली आहे. संबंधित संस्थेने पुतळा न हटविल्यास पंचायत हा पुतळा हटविण्याची पुढील कार्यवाही करेल, असे नोटिसीमध्ये म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी 6 जूनला पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या नोटिसीमुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.