गोवा काँग्रेसची क्रांतीदिनी रायबंदर – पणजी पदयात्रा

0
6

गोवा क्रांतीदिनाचे औचित्य साधून गोवा प्रदेश काँग्रेस समितीने भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते. ही पदयात्रा रायबंदर येथून सुरू झाली व आझाद मैदानावर या यात्रेचा समारोप झाला. या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांसोबतच अन्य नागरिकही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेपासून स्फूर्ती घेऊन ही पदयात्रा काढल्याचे आझाद मैदानावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी यावेळी, सर्वत्र महागाईने उच्चांक गाठला आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला असून सत्तेसाठी केंद्राताली भाजप सरकार हिंदू-मुस्लिमांत दंगली घडवून आणत असल्याचाआरोप केला. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही यावेळी सरकारवर जोरदार टीका केली.