लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे काल रात्री गोव्यात दाखल झाले. सभापती रमेश तवडकर आणि राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. ओम बिर्ला यांच्या एकदिवसीय गोवा दौऱ्यात गुरुवार दि. 15 जून रोजी सकाळी 10.30 वाजता पर्वरी येथे गोवा विधानसभेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ‘विकसित भारत 2047 ः लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर आमदारांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, उपसभापती ज्योशुआ डिसोझा आदी उपस्थित राहणार आहेत. बिर्ला हे प्रथम राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात काणकोण मतदारसंघात बलराम ट्रस्टतर्फे बांधलेल्या श्रमदान योजनेतून बांधलेल्या घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना प्रदान करणार आहेत.