इलेक्ट्रिक दुचाींच्या वापरांमध्ये देशभरात गोवा राज्य आघाडीवर आहे. वाहन डॅशबोर्डच्या ताज्या आकडेवारीनुसार गोवा राज्यात सर्वाधिक 17.20 टक्के एवढ्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे. गोव्यापाठोपाठ केरळ (13.66 टक्के) आणि कर्नाटक (12.19 टक्के) यांचा क्रमांक लागतो. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात 31 मेपर्यंत इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीमध्ये 5.63 टक्के वाढ झाली आहे.