कृषी धोरणासाठी समितीची पुनर्रचना

0
10

राज्य सरकारने राज्याचे सर्वसमावेशक कृषी धोरण तयार करण्यासाठी 24 सदस्यीय समितीची पुनर्रचना केली आहे. येत्या 6 महिन्यात गोवा कृषी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये शेतकरी, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, नाबार्ड गोवा प्रदेशाचे जीएम, कृषितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी हे सदस्य आहेत. ही समिती सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी काम करणार आहे. समितीच्या स्थापनेच्या तारखेपासून 4 महिन्यांत प्राथमिक अहवाल, तर त्यानंतर 6 महिन्यात अंतिम अहवाल तयार होईल.