केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांनी बागलकोटमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुस्लिम आरक्षण, भाजप नेत्यांचे काँग्रेसमधील प्रवेश, पीएफआयवरील बंदी आणि जेडीएस-काँग्रेस यासंबंधी अनेक बाबींवर भाष्य केले. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता आहे. त्यांची मदार भाजप सोडून आलेल्या नेत्यांवर अवलंबून आहे, हे यावरून सिद्ध होते, असे अमित शहा म्हणाले. आमचे एक-दोन नेते पक्ष सोडून आपल्या काँग्रेसमध्ये आले, याचा त्यांना खूप फायदा झाला असे वाटू लागले आहे. आमच्याच जुन्या नेत्यांचा वापर करून निवडणुका जिंकायच्या आहेत, असेही शहा म्हणाले.