राज्यात 24 तासांत नवे 99 कोरोनाबाधित

0
8

राज्यात चोवीस तासांत नवीन 99 कोरोनाबाधित आढळून आले असून, 3 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 690 एवढी झाली आहे. राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13 टक्के एवढे आहे. मागील चोवीस तासांत आणखीन 756 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच चोवीस तासांत पाच बाधितांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 89 बाधित कोरोनामुक्त झाले. राज्यातील नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जास्त असले तरी नागरिकांमध्ये सतर्कता दिसून येत नाही. नागरिक सार्वजनिक कार्यक्रम, प्रवासी बसगाड्यांतून विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहेत.