राज्यात आगीच्या घटनांत मोठी वाढ झालेली असून, वर्षभरात आगीच्या तब्बल 3258 घटना घडल्या आहेत. या आगीत तब्बल 81 कोटी रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. वर्षभरात झालेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये 10 जणांचे बळी गेले असून, 7 जणांचा जीव वाचवण्यात आणि 169 कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.