>> ‘मन की बात’मधून केले देशवासीयांना आवाहन
माणसाच्या मृत्यूनंतर देहदान केल्यामुळे आठ दहाजणांना नवे जीवन मिळते. अवयवदान एखाद्याला नवीन जीवन देण्याचे माठे माध्यम आहे. त्यामुळे अवयवदानासाठी पुढे या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काल रविवारी आज ‘मन की बात’ च्या 99 व्या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, अवयवदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका खास कुटुंबाशी देखील संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अवयवदानासाठी कोणताही वयोमर्यादा नाही. रुग्ण कोणत्याही राज्यात अर्ज करु शकतो अशी माहिती दिली. मन की बातमधून मोदींनी अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका खास कुटुंबाशी थेट संवाद साधला. त्यांची मुलगी अबावत हिने अवघ्या 39 दिवसांत जगाचा निरोप घेतला होता. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी अबावतचे अवयव दान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. यासोबतच पंतप्रधान मोदी हे झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांच्याबद्दलही बोलले. त्यांच्या कुटुंबाने देखील अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतला.
यावेळी अधिक माहिती देताना मोदींनी सरकारने अवयवदानासाठी 65 वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असेआवाहन केले. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात समान धोरणावर काम केले जात आहे. या दिशेने राज्यांचे कायमस्वरुपी रहिवासी असण्याची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.