पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बेळगावात

0
13

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेळगाव इथे कोट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असून दुपारी 2:15 ते 3:30 या वेळेत ते बेळगावात असतील. सव्वाएक तासाच्या बेळगाव दौऱ्यात ते नुतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. इथे त्यांचा रोड शो होण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर ते किसान सन्मान निधीच्या पुढील टप्प्याचा शुभारंभ करतील. याशिवाय शेतकऱ्यांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्याला लाखोंची उपस्थिती अपेक्षित असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर शिमोगा येथील विमानतळाचे उद्घाटनदेखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3.30 वाजता ते प्रचारसभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. मात्र मोदींच्या बेळगावातील या सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही.