शिवोलीत 25 लाखांचे ड्रग्स जप्त

0
12

>> हणजूण पोलिसांची कारवाई; एका इसमास अटक

गुजरातमधील एका 33 वर्षीय इसमाने मार्ना-शिवोली येथील एका व्हिलामध्ये लपवून ठेवलेला 25 लाख रुपयांचा अमलीपदार्थांचा साठा काल हणजूण पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी काल सायंकाळी चारच्या सुमारास सदर व्हिलाची झाडाझडती घेतली असता 270 ग्रॅम चरससह एकूण 4.7 लिटरच्या एकूण 475 केटामाइनच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी जयराजसिंग किरिटसिंह चावडा (33, रा. उत्तर अहमदाबाद, गुजरात) याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सावळ, पोलीस कॉन्स्टेबल रामदास हरमलकर, अर्जुन सावंत, सखाराम साळगावकर, उपनिरीक्षक साहिल वारंग यांचा समावेश होता.