न्यूझीलंडमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

0
15

तुर्की आणि सीरियानंतर काल न्यूझीलंड भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट येथे भूकंपाचे धक्के बसले. न्यूझीलंडमध्ये स्थानिक वेळेनुसार, बुधवारी संध्याकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस 50 किलोमीटर अंतरावर आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.