अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 ते 31 मार्च दरम्यान

0
17

गोवा विधानसभेचे पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 मार्च ते 31 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राज्याचा वर्ष 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख निश्चित झालेली नाही. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.