बेकायदा डोंगरकापणीची मंत्री राणेंकडून पाहणी

0
7

पणजी ते ओल्ड गोवा महामार्गाजवळील कदंब पठारावरील बेकायदा डोंगर कापणीच्या कामाची नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सायंकाळी पाहणी केली. जमीन मालकाने बांधकामासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण उल्लंघन केले आहे. सदर कामाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, तूर्त बांधकाम बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कदंब पठारावरील उतरणीवरील सुमारे 1 किलो मीटरचा भाग ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही राणे म्हणाले.