पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मशिदीत काल बॉम्बस्फोट झाला. नमाज सुरू असतानाच एका दहशतवाद्याने बॉम्बने स्वत:ला उडवले. येथील पोलीस वसाहतीमधील मशिदीमध्ये भाविक नमाज पठण करत होते, त्यावेळी बॉम्बस्फोट होऊन त्यात 46 जणांचा मृत्यू झाला, तर 150 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यातील मृताची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.