स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून, मंगळवारी आसारामला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. भारतात कधीकाळी आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. आसारामच्या सत्संगमध्ये अनेक राजकीय मंडळींनी देखील हजेरी लावली होती. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या संशयित होते. मात्र इतर सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.