जम्मू- काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या नासिर अहमद शेर गोजरी उर्फ कासिम भाई या दहशतवाद्याला अटक केली आहे. 2017 पासून नासिर हा सक्रिय होता. तेव्हापासून तो विविध गुन्हेगारी प्रकरणात सहभागी होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हादेखील दाखल केला आहे. जम्मू-काश्मीरमधील इदगाह भागात नुकताच हल्ला झाला. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमध्ये एजाज अहमद देवा नावाचा एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे.