अधिवेशन कालावधीत जमावबंदी आदेश जारी

0
12

गोवा विधानसभेच्या १६ ते १९ जानेवारी या कालावधीत होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी विधानसभा संकुलाच्या आजूबाजूच्या ५०० मीटर आणि पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जमावबंदीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जारी केला आहे. हा आदेश १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून अमलात येईल आणि विधानसभेचे अधिवेशन संपेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात संमेलन आणि पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येणे, मिरवणुका काढणे किंवा आयोजित करणे, लाठी, तलवारी, खंजीर किंवा भाले, बंदूक किंवा शस्त्रे बाळगणे, लाउडस्पीकरचा वापर, घोषणाबाजी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.