कांदोळी पंचायत क्षेत्रातील ओर्डा-सांताक्रूज वाड्यावर दोन चिमुकल्या मुलांच्या हत्येची हृदय हेलावणारी घटना घडली. त्यासोबतच मुलांच्या हत्येनंतर पित्याने आत्महत्या केली होती. त्या तिघांच्याही पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शनिवारी रात्री ज्यो फर्नांडिस या पित्याने आपली पोटची मुलगी अनानिया फर्नांडिस (१३) आणि मुलगा जोझेफ फर्नांडिस (८) या दोघांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली होत. त्यानंतर त्याने स्वत: त्याच दोरीने घराच्या बाजूला गळफास लावून आत्महत्या केली होती. सदरची हत्या व आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र ही घटना पती-पत्नीच्या भांडणामुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीनंतर या तिघांच्याही पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे