माझा भाऊ योद्धा; प्रियांकांची स्तुतीसुमने

0
13

केंद्र सरकारसह अनेक राज्यातील सरकारांनी कोट्यवधी रुपये खर्च करून माझ्या भावाची प्रतीमा माझ्या खराब करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध अनेक तपास यंत्रणा लावल्या; पण माझा भाऊ योद्धा आहे. अदानी-अंबानींनी मोठे नेते विकत घेतले.

देशातील सर्व ‘पीएसयू’ विकत घेतले. देशातील मीडिया विकत घेतला; पण माझ्या भावाला विकत घेऊ शकले नाहीत आणि विकत घेऊ शकणार देखील नाही, अशी शब्दांत प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची स्तुती केली. कॉंग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये काल पोहोचली. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी हे उद्गार काढले.