१२८ पॅरा शिक्षकांचे चार महिन्यांचे प्रलंबित वेतन तात्काळ वितरित करण्याची मागणी काल गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. राज्यातील १२८ पॅरा शिक्षकांचा पगार मागील ४ महिन्यांपासून प्रलंबित असून, तो त्वरित वितरित करावे, अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केली.
राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांवर करण्यात येणारा फालतू खर्च थांबवून योग्य गोष्टींवर खर्च करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सरकारकडे पीआर इव्हेंट्स आणि होर्डिंग्जवर खर्च करण्यासाठी पुरेसा आहे; परंतु शिक्षकांना पगार देण्यासाठी निधी नाही. राज्य सरकारकडे शिक्षकांचा पगार देण्यासाठी ५० लाख रुपये नाहीत का? असा प्रश्नही कामत यांनी उपस्थित केला.