५८ ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

0
10

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित तब्बल ५८ ठिकाणांवर छापेमारी केली. एनआयएचे वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली आहे. तसेच इतर अनेक ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली.