ड्रायव्हिंग लायसन्सबाबत कडक धोरण गरजेचे : सिंग

0
17

ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणारी यंत्रणा आणखीन कडक करण्याची शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे. रस्ता अपघातांवर नियंत्रण आणून अपघाती मृत्यूदर कमी करण्याची मोठी जबाबदारी राज्यातील वाहतूक पोलिसांवर आहे, असे प्रतिपादन पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित गोवा पोलीस स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना काल केले.

एखाद्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स तेव्हाच मिळायला हवे, जेव्हा परवाना जारी करणार्‍या अधिकार्‍याला १०० टक्के खात्री असेल की हा चालक रस्त्यावर वाहन चालवण्यास सक्षम आहे. वाहतूक सुरक्षेचे मोठे आव्हान आहे. वाहतूक सुरक्षेसाठी रस्ते अभियांत्रिकी, नागरी समाज यांचेही योगदान महत्त्वाचे आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

गोवा पोलिसांचे गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण ८५ टक्के एवढे आहे. गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विभागाने सुध्दा चांगली कामगिरी बजावली आहे, असेही सिंग यांनी सांगितले.