राज्यातील खाणपट्ट्यांच्या ई-लिलावामध्ये डिचोली ब्लॉक -३ अर्थात मोंत दी शिरगाव हा खाणपट्टा बांदेकर कंपनीने काल मिळविला.
राज्यातील चार खाणपट्ट्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. मोंत दी शिरगाव या खाणपट्ट्याचे क्षेत्र ९७ हेक्टर एवढे आहे. बांदेकर कंपनीने हा खाणपट्टा १११.२८ टक्क्यांनी मिळविला आहे.
राज्यातील आत्तापर्यंत तीन खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला आहे. डिचोलीतील पहिला खनिज पट्टा वेदांता, दुसरा खाणपट्टा साळगावकर कंपनीने मिळविला आहे. गोव्यातील खाण कंपन्यांनाच तीनही खाणपट्टे मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. दरम्यान, खनिज लिलावातील चौथा खाणपट्टा अर्थात काले खाणपट्ट्याचा लिलाव पुढील आठवड्यात होणार आहे.