पर्यावरण संचालकपदी नागवेकर यांची नियुक्ती

0
11

राज्य सरकारने एका आदेशाद्वारे पर्यावरण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांची बदली केली असून, पर्यावरण खात्याच्या संचालकपदी डॉ. गीता नागवेकर यांची नियुक्ती केली आहे. गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि पीडब्लूडी संचालक (प्रशासन) पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. नागवेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, बदली करण्यात आलेल्या दशरथ रेडकर यांना कार्मिक विभागाकडे संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.