ऍड. गजानन सावंत मारहाणप्रकरणी न्यायालयाकडून पोलिसांना नोटिसा

0
19

ऍड. गजानन सावंत यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने काल स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली. याप्रकरणी न्यायालयाने राज्याचे पोलीस महासंचालक, गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक व ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या पर्वरी पोलीस स्थानक हद्दीतील पोलीस निरीक्षक यांनाही नोटिसा बजावल्या आहेत.

यासंबंधीची सुनावणी न्यायालयाने २१ डिसेंबर रोजी मुक्रर केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला २० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. अशी माहिती ऍड. सुबोध कंटक यांनी दिली.

याप्रकरणी एक हेडकॉन्स्टेबल व तीन पोलीस कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर खात्यांतर्गत चौकशीही होणार आहे.