>> बाजू मांडण्यासाठी १० दिवसांची मुदत
पर्यटन खात्याने पर्यटन व्यवसाय कायद्याअंतर्गत नोंदणी न केलेल्या तीन ट्रॅव्हल्स कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. पर्यटन व्यवसाय कायद्याअंतर्गत पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करणार्यांना पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पर्यटन खात्याकडे नोंदणी न केलेल्या अनेक हॉटेल व इतर व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा पाठवून नोंदणीची सूचना केली आहे. पर्यटन खात्याकडे नोंदणी न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. क्रिकेटपटू युवराज सिंग यांनाही अशाच प्रकारातून नोटीस बजावण्यात आली आहे.
पर्यटन खात्याने हरयाणा, मुंबई येथील ट्रॅव्हल्स कंपन्यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना बाजू मांडण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ डिसेंबर २०२२ रोजी घेतली जाणार आहे.
पर्यटन दुरुस्ती कायद्यानुसार ट्रॅव्हल्स एजन्सी आणि ऑनलाइन सेवा देणार्यांना पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे पर्यटन खात्याचे उपसंचालक कुलदीप आरोलकर यांनी म्हटले आहे.