आमदार गणेश गावकर यांना श्रीलंकेत हृदयविकाराचा झटका

0
12

सावर्डेचे आमदार, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांना श्रीलंकेच्या खासगी दौर्‍यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थीर आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीलंकेमध्ये उपचार घेणार्‍या आमदार गावकर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली आहे.
तसेच, त्यांच्यावर उपचार करणार्‍या इस्पितळातील डॉक्टरांशी संपर्क साधून आमदार गावकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. आपण स्वतः आमदार गावकर यांंच्याशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. आमदार गावकर यांची प्रकृती स्थीर असून त्यांचे कुटुंबीय काल रविवारी श्रीलंकेला रवाना झाले.
आमदार गावकर यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्यानंतर त्यांना गोव्यात हालविण्यात येणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली.