समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, तसेच त्यांना २५ हजारांचा दंडही ठोठावला. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एक भाषण केले होते. याच भाषणात त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर खटला उभा राहिला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यावरच न्यायालयाने काल आझम खान यांना दोषी ठरवले आणि त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला.