‘इमॅजिन पणजी’वर मोन्सेरात पिता-पुत्र

0
8

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संचालक मंडळावर महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि त्यांचा पुत्र तथा पणजीेचे महापौर रोहित मोन्सेरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. राज्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल (आयएएस) या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मामू हागे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या इतर सदस्यांमध्ये अवर सचिव (वित्त), गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार, गोवा सरकारचे मुख्य सचिव, महानगरपालिका आयुक्त आणि इतर अधिकार्‍यांचा समावेश आहे.