महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य

0
10

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. गेल्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांनाही स्थान दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. भाजपकडून या मंत्रिमंडळाच्या विस्तारात नितेश राणे, गोपीचंद पडळकर, गणेश नाईक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या वेळच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ जण आणि भाजपच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आणि आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होती. भाजपमध्येही प्रमुख नेत्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये या नाराजांना स्थान मिळू शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.