झुआरी पूल रविवारी वाहतुकीस बंद राहणार

0
17

रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी झुआरी पूल सकाळी ६ ते ९ असे तीन तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाची डेक लेव्हल तपासणी आणि पुलाच्या एकंदर पाहसाठी तो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ६ ते ९ या दरम्यान वाहतूक बोरी पुलावरून (राष्ट्रीय महामार्ग-१७ ब) वळवण्यात येणार आहे. त्याचबरोबरच झुआरी नदीतून कुठ्ठाळी ते आगशी आणि आगशी ते कुठ्ठाळी अशा दोन्ही बाजूने फेरी सेवाही चालू ठेवण्यात येणार आहे.