टॅक्सी मालक – चालकांचा गोवा टॅक्सी ऍपला विरोध

0
11

येथील आझाद मैदानावर राज्यातील टॅक्सी मालक-चालकांनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या आगामी गोवा टॅक्सी ऍपला जोरदार विरोधी काल केला आहे.

वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी वाहतूक आणि पर्यटन खात्याकडून नवीन टॅक्सी ऍप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. जीईएलकडून हा टॅक्सी ऍप तयार केला जाणार आहे. सर्व टॅक्सीचालकांना त्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे.

राज्यातील स्थानिकाच्या हातात असलेला टॅक्सी व्यवसाय हिसकावून घेण्यासाठी टॅक्सी ऍप तयार करण्याचे षड्‌यंत्र रचण्यात आले आहे. राज्य सरकारकडून टॅक्सी ऍप तयार केला जाणार होता. मग, टॅक्सींनी डिजिटल मीटर कशाला बसविले? असा प्रश्‍न टॅक्सी व्यावसायिक सुनील नाईक यांनी उपस्थित केला.

राज्यात टॅक्सी ऍप सुरू करण्यापूर्वी सर्व टॅक्सी मालकांना विश्‍वासात घेऊन त्यांंच्या सूचना जाणून घ्याव्यात. गटागटांनी टॅक्सी मालकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली.
ऍपच्या आधारे टॅक्सी व्यवसाय चालतो मग, दाबोळी विमानतळावर गोवा माईल्सचा काउंटर कशाला सुरू करण्यात आला आहे. सरकारकडून टॅक्सी मालकांची दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही नाईक यांनी केला.