मन सुन्न… चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

0
12

उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये मन सुन्न करणारी आणि कोणाच्याही डोळ्यात चटकन अश्रू आणणारी घटना घडली. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी केलेल्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागले. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सदर चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखलही करण्यात आले; पण त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

नोएडातील सेक्टर १०० मधील लोटस सोसायटीच्या आवारा ही दुर्दैवी घटना घडली. मूळचे मध्यप्रदेशातील असलेेले एक दाम्पत्य नोएडामध्ये मजुरीखाली कामासाठी आले होते. नोएडामध्येच ते एका भाड्याच्या घरात राहत होते. लोटस सोसायटीत काम मिळाल्याने ते तिथे आले होते. नवरा-बायको दोघेही आपल्या मुलासह सोमवारी आले. तिथेच काम करतेवेळी एक जागा पाहून त्यांनी आपल्या मुलाला चादर टाकून झोपवले. त्यानंतर ते कामाला लागले. यावेळी काही मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका जबर होता, की चिमुरडा गंभीररीत्या त्यात जखमी झाला. चिमुरड्याच्या पोटाचे आतडेही कुत्र्यांनी आपल्या दाताने जखमी केले होते. चिमुरड्याच्या किंकाळ्यांनी आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यावेळी त्यांना या घटनेचे गांभीर्य कळले. मदतीसाठी धावलेल्या लोकांनी अखेर कुत्र्यांना पळवून लावले. मात्र उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू झाला.